बाबा आज काही सांगायचे होते ...

नाही नाही,.... महत्वाचे काही नाही ,
तुमच्या सोबत फ़क्त दोन शब्द बोलायचे होते....... .
बाबा , हो ... खरच आज थोड़ा संवाद साधायचा आहे ,
तुमच्या -माझ्या मधले ते अंतर आज संपवायचे आहे......

''बाबा '' हा  शब्दच मला आधी थरकाप द्यायचा ,
देवाने त्याच्या प्रतिकृति सोबत हा ''वाघ '' का जोडला ? हा प्रश्न मला नेहमी पडायचा,
पण ..... पण..... हळू हळू हे कोड़ सुटत गेल ,
कारण तो वाघच आपल या जगात श्वास घ्यायच लाइसेंस असत हे मला कळाले......


बाबा तुमच कठोरपन हे नेहमी राग द्यायचा ,
तुम्ही म्हणजे ''प्रमोशन न देण्याऱ्या बॉस '' सारखे वाटायचात ,
पण ..... पण..... हळू हळू हे कोड़ सुटत गेल , 
कारण तो बॉसच ''कोणतेही श्रेय न घेणारा देव '' आहात हे मला कळाले.....बाबा तुम्ही विचाराल कि आजच का मी हे सांगतोय ?
''फादर्स डे '' आहे म्हणून तर नाही ना असे बडबडतोय?
पण ..... पण......  बाबा ,खरच हे सगळ तुम्हाला केव्हाच सांगायचे होते,
मनात असले तरी त्यांना कोम्ब मात्र फूटत नव्हते... 

बाबा, Thank You !!!! 
एवढच तुम्हाला सांगायचे होते ... 

Comments

Post a Comment